Mpsc Guru

Focus on commitment, not motivation.

Tuesday, November 26, 2019

सामान्य विज्ञान- मानवी शरीर इंद्रिय संस्था (भाग १) | Mpsc Science Notes

mpsc short notes by mpsc guru- science

पेशी-

सर्व सजीवांच्या कार्याचे मुलभूत एकक पेशी असतात.
पेशीचा शोध रॉबर्टहुक या शास्त्रज्ञांने लावला.
रॉबर्ट ब्राऊन या शास्त्रज्ञांने पेशीतील केंद्रकाचा शोध लावला.
केंद्रक पेशीतील सर्व चयापचय क्रियावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते.
मानवी पेशीमध्ये एकच केंद्राक असते. (अपवाद स्नायुपेशी)
मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी चेता पेशी आहे.
गोल्गी बॉडीज ला पेशीतील गोदाम असे म्हणतात.
तंतुकनिका ला पेशीतील उर्जाघर असे म्हणतात.
पेशीमध्ये RNA आणि DNA हे मुख्य घटक असतात.
फ्रेडरिक मिशर यांनी DNA चा शोध लावला.
DNA ची प्रतिकृती वाटसन आणि क्रिक यांनी तयार केली.
डॉ हरगोविंद खुराना यांनी प्रयोगशाळेत कृत्रिम जीन्स तयार करण्याचा प्रयत्न केला.
मानवी पेशीत गुंणसुत्राच्या २३ जोड्या असतात. त्यापैकी एक जोडी लिंग सूत्राची असते.
मंगोलिझम या आजारात ४६ एवजी ४७ गुणसूत्रे असतात.
शरीरात विशिष्ट कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहास उती म्हणतात. तर वेगवेगळ्या उतीपासून इंद्रिय तयार होते.
मानवी शरीरात ९ इंद्रिय संस्था आहे.

१) रक्ताभिसरण संस्था-

हृदय, रक्त आणि रक्तवाहिन्या मिळू रक्ताभिसरण संस्था तयार होते.
विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरनाचा शोध लावला.
फुफ्फुसामध्ये रक्त शुद्ध केले जाते तर हृदयात साठवले जाते.
रक्तवाहिन्या ३ प्रकारच्या असतात.
१) धमन्या - शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात.
२) शिरा- अशुद्ध रक्त गोळा करून हृदयाकडे पाठवतात.
३) केशवाहीन्या - अशुद्ध रक्त शिराकडे पाठवतात.

रक्त-

मानवी शरीरात सर्वसाधारणपणे ५ ते ६ लिटर रक्त असते. शरीराच्या वजनाच्या ९ % च्या आसपास.
रक्ताचा PH ७.३० ते ७.४५ असून ते अल्कधर्मी असते.
रक्तामध्ये असलेल्या हिमोग्लोबिन मुळे रक्त लाल दिसते.
रक्तामध्ये रक्तद्रव्य, RBC WBC आणि PLATELETES यांचा समावेश होतो.

RBC लाल रक्तपेशी- 

लाल पेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होते. आणि प्लीहेत यांचा नाश होतो. या पेशीतील हिमोग्लोबिनमुळे यांना लाल रंग प्राप्त होतो.
याची संख्या १ घन मिली मी रक्तात ५० लाख एवढी असते.
रक्तातील लाल पेशींचे आयुष्य १२० दिवस असते.
RBC ऑक्सिजनयुक्त रक्ताचे वाहन करण्याचे कार्य करतात.
सस्तन प्राण्यांतील लाल पेशीत केंद्रक नसते. (अपवाद उंट)

WBC पांढऱ्या पेशी- 

या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात. या पेशी रोगांपासून शरीराचे रक्षण करण्याचे कार्य करतात.एक घन मी.मी. रक्तात यांचे प्रमाण ५ ते ८ हजार इतके असते. या पेशी २ आठवडे जगतात. यांची निर्मिती प्लीहा,अस्थिमज्जा मध्ये होते. या पेशींच्या अनियंत्रीत वाढीमुळे कर्करोग होतो.

चपट्या पेशी PLATLETETS- 

या पेशींना रक्तबिंबीका असेही म्हणतात. एक घन मी.मी. रक्तात यांची संख्या ४ ते ५ लाख इतकी असते. यांची निर्मिती अस्थिमज्जेत होते.या पेशींचे प्रमुख कार्य रक्त गोठविने आहे.
रक्त गोठविण्यासाठी रक्तात फायब्रीन, कॅल्शियम, K जीवनसत्व आणि चपट्या पेशीची आवश्यकता असते.
प्लीहेमधून हिप्यारीन नावाचे विकार रक्त शरीरात गोठू नये म्हणून स्रवले जाते.
रक्तदान केल्यानंतर ते रक्त गोठू नये म्हणून त्यात कॅल्शियम ऑक्झलेट टाकतात. 

रक्तगट -

कार्ल लैंडस्टैनर याने रक्तगटाचा शोध लावला.
रक्तगटाचे ४ प्रकार आहे - A, B, AB, आणि O
AB रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना सर्व रक्तगटाचे रक्त चालते म्हणून त्यांना सर्वायोग्य ग्राही म्हणतात तर O रक्तगट असणाऱ्या व्यक्ती चे रक्त सर्व व्यक्तींना देता येते म्हणून त्यांना सर्वायोग्य दाता असे म्हणतात.
रक्तदाब- धमनीतील रक्ताच्या दाबाला रक्तदाब म्हणतात.
अधिवृक्क ग्रंथी रक्तदाब नियंत्रित करते.
निरोगी माणसाचा रक्तदाब १२०/८० MM OF HG एवढा असतो.

२) अस्थीसंस्था-

मानवी शरीरात जन्मल्यानंतर ३०० हाडे असतात.ते वयानुसार एकमेकांशी जोडले जातात म्हणून प्रौढ व्यक्तीत २०६ हाडे असतात.
माणसाच्या छातीत २४ बरगड्या असतात. त्यांच्या १२ जोड्या असतात.
पाठीच्या मणक्यांची संख्या- ३३
मानेमध्ये- ७ मानके
छाती-१२ मानके
कमरेच्या भागात- ५ मानके 
त्रिकास्थी - ५ मानके
माकडहाड- ४ मानके
हाडांची संख्या -
हातात- प्रत्येकी ३०
पायात - प्रत्येकी ३०
कवटी- २२ हाडे
प्रत्येक कानात ३ हाडे असतात.
शरीरातील सर्वात लहान हाड स्टेप्स हे कानात असते.
शरीरातील सर्वात मोठे हाड फेमर  हे मांडीत असते.
हाडे कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेली असतात.
ड जीवनसत्व हाडांच्या बळकटी साठी आवश्यक असते.
शरीरातील खनिज पदार्थांचे प्रमाण वाढल्यास हाडे ठिसूळ होतात.
@Mpsc short notes by mpsc guru

 


No comments:

Post a Comment