Mpsc Guru

Focus on commitment, not motivation.

Sunday, October 13, 2019

Mpsc state service exam information and Syllabus | राज्यसेवा पूर्व परिक्षा सविस्तर माहिती आणि अभ्यासक्रम.

नमस्कार विद्यार्थी मित्रहो आज आपण राज्यसेेवा पूर्व परीक्षेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. राज्यसेवा परिक्षा हि कडून घेण्यात येणारी सर्वात महत्वाची परिक्षा आहे. दरवर्षी साधारण डिसेंबर मध्ये राज्यासेवा पूर्व परीक्षेची जाहिरात येते आणि फेब्रुवारी किवा मार्च मध्ये पूर्व परिक्षा होते.गट अ आणि गट ब मिळून एकूण २८ प्रकारची विविध पदे या परीक्षेतून भरण्यात येतात. त्यामधे
Mpsc state service exam syllabus

 •  उपजिल्हाधिकारी, 
 • पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त, 
 • उपनिबंधक, 
 • उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
 • तहसीलदार
 • मुख्याधिकारी
 • शिक्षणाधिकारी
 • लेखाधिकारी
 • अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क
 • उपाधीक्षक भूमी अभिलेख
 • कक्ष अधिकारी
 • नायब तहसीलदार  
अशा प्रकारची हि पदे असतात. एकूण जागांची संख्या दरवर्षी शासनाच्या मागणीनुसार ठरवली जाते.

 राज्यसेवा पूर्व परिक्षा सविस्तर माहिती आणि अभ्यासक्रम | Mpsc state service exam information and Syllabus.

 • राज्यसेवा परीक्षेचे टप्पे- 

राज्यसेवा परिक्षा ३ टप्प्यात घेण्यात येते.
१) पूर्व परिक्षा- २०० गुण
२) मुख्य परिक्षा - ८०० गुण
३) मुलाखत - १०० गुण
यातील पूर्व परिक्षा हि पात्रता परिक्षा असून तिचे गुण अंतिम निवडीच्या वेळी विचारात घेत नाही. पूर्व परीक्षेतू मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी गुणांची सीमारेषा (कट -ऑफ) ठरवली जाते
 • परीक्षेसाठी शैक्षणिक अर्हता-

 • उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा किवा समतुल्य पदवी असावी.(काही पदांसाठी विशेष विषयातील पदवी आवश्यक असते उदा. लेखाधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.
 • मराठी भाषेचे ज्ञान असावे.
 • पदवीच्या शेवटच्या वर्षात असलेले विद्यार्थी पूर्व परीक्षेसाठी पात्र असतात.
 • शारीरिक अर्हता- 

 खालील पदांसाठी जाहिराती मध्ये नमूद शारीरिक पात्रता असावी लागते.
 • पोलीस उपअधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त
 • अधीक्षक/उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क
 • सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी
 • परिक्षा फी - 

राज्यसेवा पूर्व तसेच मुख्य परीक्षेसाठी अमागास प्रवर्गातील उमेदवारांना ५२४ रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३२४ रुपये फी भरणे आवश्यक आहे.
 • राज्यसेवा पूर्व परिक्षा-

प्रत्येकी २०० गुणांचे दोन पेपर घेण्यात येतात. प्रत्येक पेपरला दोन तास वेळ देण्यात येतो.
 • पेपर १ सामान्य ज्ञान(GS)- १०० प्रश्न २०० गुणांसाठी. 
 • पेपर २ CSAT- ८० प्रश्न २०० गुणांसाठी.
चुकीच्या ३ उत्तरासाठी २ गुण वजा केले जातात.
 • राज्यसेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम | MPSC STATE SERVICE PRE SYLLABUS-

 • पेपर १ - २०० मार्क. 
  १) भारताचा इतिहास-  महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारताचा इतिहास, भारताची स्वातंत्र चळवळ, स्वातंत्रपूर्व सामाजिक आर्थिक शैक्षणिक परिस्थिती.
   २) महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा भूगोल- प्राकृतिक , सामाजिक ,राजकीय, आर्थिक, भूगोल.
  ३) नागरिकशास्त्र- राज्यघटना, प्रशासन, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, शहरी प्रशासन, हक्क आणि कर्तव्ये, निवडणुका, न्यायव्यवस्था.
  ४) सामान्य विज्ञान- रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, शरीरविज्ञान.
  ५)अर्थशास्त्र- सामाजिक विकास,गरिबी, समावेशान, लोकसंख्या, आर्थिक विकास, अर्थव्यवस्था, उत्पन्न, सरकारी योजना.
  ६)पर्यावरण परिसंस्था जैव- विविधता वातावरण बदल आणि इतर पर्यावरणीय मुद्दे. 
  ७) चालू घडामोडी- महत्वाच्या राज्य, देश व अंतरराष्ट्रीय घडामोडी. 
 • पेपर २ - २०० मार्क.     
   1) सामान्य मानसिक क्षमता 
  2) संवाद कौशल्य
  ३) मराठी आणि इंग्रजी आकलन कौशल्य.
  4) निर्णय क्षमता आणि समस्या सोडवणे.
  ५) आकलन
  6) मूलभूत संख्या-  संख्या आणि त्यांचे नाते,  परिमाण क्रम माहितीचे विश्लेषण , तक्ते, नकाशे इत्यादी.
  7) तार्किक आणि विश्लेषणात्मक क्षमता 
 • परिक्षा केंद्र - 

पूर्व परिक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा केद्रावर घेण्यात येते.
परिक्षा केंद्र ऑनलाईन अर्ज करतेवेळी निवडावे.
 • राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल- 

पूर्व परीक्षेतील दोन्ही पेपरचे गुण एकत्र करून मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेद्वारांसाठी गुणांची सीमारेषा कट ऑफ निश्चित केला जातो. पूर्व परीक्षेमधून एकूण पदांच्या १२ पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी निवडण्यात येतात. प्रत्येक प्रवार्गासाठी   हि गुणांची सीमारेषा वेगवेगळी असते.
 • राज्यसेवा मुख्य परिक्षा-

मुख्य परिक्षा एकूण ८०० गुणांसाठी घेण्यात येते. यात  मराठी -इंग्रजी पेपर २०० गुणांसाठी आणि 
GS-1
GS-2
GS-3
GS-4 
 हे चार सामान्य अध्ययन पेपर प्रत्येकी १५० गुणांसाठी घेण्यात येतात. 
राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आमच्या वेबसाईटवर देण्यात आला आहे. आपण अभ्यासक्रम कटेगरी मध्ये जाऊन बघू शकता.
 • मुख्य परिक्षा राज्यातील मुंबई, औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या चार केंद्रावर घेण्यात येते.
 • राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल | MPSC STATE SERVICE MAIN EXAM RESULT-

राज्यसेवा मुख्य परीक्षेमधून एकूण जागांच्या ३ पट उमेदवार मुलाखतीसाठी बोलविण्यात येतात. मुलाखत १०० गुणांसाठी घेण्यात येते.यावेळी उमेदवारांना आपले कागदपत्रे सदर करावी लागतात.
 • अंतिम निकाल- 

मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमधील गुण यांची बेरीज करून अंतिम निकाल उमेदवारांनी दिलेल्या पदांच्या पसंतीक्रमानुसार जाहीर केला जातो .
          अशा प्रकारे आपण राज्यसेवा परीक्षेबद्दल सर्व महत्वाची प्रक्रिया बघितली आहे. तुम्हाला हि माहिता आवडली असेल तर ती आपल्या मित्रांशी शेअर करा अधिक माहीतसाठी www.mpscguru.com या वेबसाईट ला भेट देत राहा. आपले काही प्रश्न असतील तर ते खाली कमेंट करून विचारा  धन्यवाद...
No comments:

Post a Comment