Mpsc Guru

Focus on commitment, not motivation.

Sunday, October 20, 2019

Maha pariksha arogya sevak exam 2019 imp questions part1 | महापरिक्षा आरोग्य सेवक परीक्षा 2019 महत्वाचे 200 प्रश्न

  महापरिक्षा आरोग्य सेवक परीक्षा 2019 महत्वाचे 200 प्रश्न Part 1

Maha pariksha arogya sevak exam 2019 imp questions

 

            आज आपण येणाऱ्या आरोग्य सेवक परीक्षेसाठी महत्वाचे 200 संभाव्य प्रश्न उत्तरासह पाहणार आहोत त्यांचा तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच फायदा होईल तसेच हे प्रश्न तुम्ही आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका
1) रक्तगटाचा शोध कोणी लावला?
Ans- कार्ल लँडस्टायनर
2) एकूण आहारापैकी किती ऊर्जा आपल्याला प्रथिनांमधून मिळते?
Ans-10 टक्के
3) प्रसूतीच्या कळा वाढविण्याकरिता ऑक्सिटोसीन हे कोणत्या मार्गाने दिले जाते?
Ans-इंट्राव्हॅनस ड्रीप
4) मोतिबिंदू कशातील दोषामुळे होतो?
Ans- नेत्रभिंग
5) चल सांध्यांचे एकूण प्रकार किती?
Ans- पाच
6) हाडांमध्ये कोणता तंतुमय पदार्थ असतो?
Ans- कोलाजन
7 कोणत्या घटकामुळे त्वचेला काळा रंग प्राप्त होतो?
Ans- मेलेनिन
8) मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत अवयव कोणता?
Ans- पेशी
9) टायफॉईड चे रोगजंतू कोणत्या आकाराचे असतात?
Ans- दंडाकृती
10) मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आदीजीवापासून होतो?
Ans- प्लाझमोडीअम
11) सर्वात जास्त क जीवनसत्व काशामधून मिळते?
Ans- आवळा
12) लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?
Ans- रक्तक्षय
13) ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरतात?
Ans- निर्जंतुकिकरण
14) भारतात कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षांपासून सुरू झाला?
Ans- 1955
15) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
Ans- पुणे
16) WHO चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
Ans- जिनिव्हा
17)  कोणता विषाणू तोंडावाटे प्रवेश करून चेतासंस्था प्रभावित करतो?
Ans- पोलिओ
18) संतृप्त स्निग्ध पदार्थाच्या अतिसेवनाने कोणता विकार होतो?
Ans- धमनीकठिण्यता
19) DNA च्या निर्मितीसाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते?
Ans- बी
20) राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात भारतात कधीपासून झाली?
Ans- 1982
21) PCPNNDT Act गर्भलिंग निदान पूर्वचाचणी प्रतिबंध कायदा केव्हापासून लागू झाला?
Ans- 1994
22) रक्तपिती हा आजार कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतो?
Ans- ड
23) हृदयातील रक्त शरीराच्या इतर भागाकडे वाहून नेण्याचे कार्य कोण करते?
Ans- धमन्या
24) DOTS चे पूर्णरुप काय?
Ans- Directly observed treatment short course
25) जागतिक परिचारिका दिन कोणता?
Ans- 12 मे
26) कोणता रक्तगट सर्वदाता म्हणून ओळखला जातो?
Ans- O
27) लाळेमध्ये कोणते विकर असते?
Ans- टायलिन
28) एक ग्रॅम कार्बोदकापासन किती ऊर्जा प्राप्त होते?
Ans- 4 कॅलरी
29) MRI  चे पूर्णरुप काय?
Ans- Magnetic resonance lmaging
30) रंगआंधळेपणा कोणत्या दोन रंगाबाबद विशेषत्वाने जाणवतो?
Ans- हिरवा आणि लाल
31) विकर हे काय आहे?
Ans- प्रथिन
32) सर्वसामान्य प्रौढ माणसाच्या शरीरातील तांबड्या पेशींशी पांढऱ्या पेशींशी असलेले प्रमाण काय?
Ans- 700:1
33) लसीकरणानंतर शरीरामध्ये काय तयार होते?
Ans- अँटिबॉडीज
34)  मानवाच्या शरीरामधील लोहित रक्तकनिकांचे आयुष्यमान किती असते?
Ans- 120
35) पेशींची उर्जाकेंद्रे कोणास म्हणतात?
Ans- मायटोकॉड्रिया
36) मानवी शरीरातील सर्वाधिक लांब पेशी कोणती?
Ans- चेतापेशी
37) ब जीवनसत्त्वाच्या अभावी कोणता रोग होतो?
Ans- बेरिबेरी
38) गोवरची लस बालकाला किती महिन्यातून देतात?
Ans- 09 ते 12 महिने
39) स्वाईन फ्लू या आजाराचा कारक कोणता आहे?
Ans- एच1 एन1 विषाणू
40) मानवी मनगटात किती हाडे असतात?
Ans- 8
41) चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात?
Ans- डायॉप्टर
42) गोवर हा रोग कशामुळे होतो?
Ans- विषाणू
43) माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते?
Ans- 36.9 अंश से.
44) यकृतात कोणता रस तयार होतो?
Ans- पित्तरस
45) डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?
Ans- आयरीस
46) पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?
Ans- ब3
47) चेतातंतूंचे किती प्रकार असतात?
Ans- 2
48) ब्लु बेबी म्हणजे काय?
Ans- जन्मतःच हृदयात दोष असणारे मुल
49) डेंग्यू या आजाराचा प्रादुर्भाव कशाने होतो?
Ans- एडिज इजिप्ती डास
50) ग्लुकोजचे कोठार कशाला म्हणतात?
Ans- यकृत

 MahaPariksha Arogya Sevak Exam 2019 Practice Questions BY MPSCGURU

51) मनुष्यतील मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता?
Ans- प्रमस्तिष्क
52) मानवी शरीरात किती मणके असतात?
Ans- 33
53) वस्तू स्पष्ट दिसण्यासाठी वस्तूचे डोळ्यापासूनचे लघुत्तम अंतर किती असावे?
Ans- 25 सेमी
54) लहान आतड्यातील कोणत्या विकारामुळे प्रथिनांचे पचन होते?
Ans- टेप्सीन
55) पेशीतील टाकाऊ पदार्थाना काय म्हणतात?
Ans- गोल्जिपिंड
56) स्रियांमध्ये X गुणसूत्रे कोणाकडून मिळतात?
Ans- आई व वडिलांकडून
57) कर्करोगात पेशींचे विभाजन कोणत्या पध्दतीने होते?
Ans- अनियंत्रित विभाजन
58) अमिबामध्ये प्रजनन कोणत्या प्रकारे होते?
Ans- विखंडन व द्विविखंडन
59) अन्नाचे पचन कोठे होते?
Ans- लहान आतडे
60) गालफुगी हो रोग कोणामुळे होतो?
Ans- विषाणू
61) कोणत्या खनिजांच्या अभावी पंडुरोग होतो?
Ans- लोह
62) सापाचे विष कशावर हल्ला करते?
Ans- रक्ताभिसरण
63) शरीराचे तापमान नियंत्रणासाठी मेंदूचा कोणता भाग कार्य करतो?
Ans- हायपोथेलॉमस
64) हिमोफिलिया हा रोग मानवामध्ये कशामुळे होतो?
Ans- उत्परिवर्तीजीनमुळे
65) नेत्रदान करतेवेळी कोणता भाग दान करतात?
Ans- पारपटल
66) झाडाचे वय कशावरून ठरवतात?
Ans- झाडाच्या खोडावरील वर्तुळे
67) गॉयटर म्हणजे कोणत्या ग्रंथिला आलेली सूज?
Ans- थायरॉइड
68) राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम भारतात कधी सुरू करण्यात आला?
Ans- 1958
69) रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे?
Ans- हिमॅटोलॉजी
70) देवी हा आजार कोणत्या विषाणूमुळे तात्काळ होणारा आणि अत्यंत सांसर्गिक आहे?
Ans- व्हेरिओला
71) इन्सुलिनचे प्रमाण कोणत्या आजारात कमी होते?
Ans- मधुमेह
72) एकपेशीय प्राण्यास काय म्हणतात?
Ans- आदीजीव
73) हृदयास ऑक्सिजन कमी पडल्यास कोणता आजार होतो?
Ans- अंजायना पेक्टोरिस
74) मोठ्या आतड्याची लांबी किती असते?
Ans- 1.5 ते 2 मीटर
75) स्फुटम मग म्हणजे काय?
Ans- थुंकीचे भांडे
76) पालेभाज्या मधील कोणते जीवनसत्व हे कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपात असते?
Ans- अ
77) एक लिटर गायीच्या दुधातून किती मिलिग्राम कॅल्शियम मिळते?
Ans- 1200
78) मानवी जीवनासाठी किती जीवनसत्त्वे आवश्यक असतात?
Ans- 13
79) ड जीवनसत्त्वाच्या अभावी बालकांना कोणता आजार होतो?
Ans- मुडदूस
80) रेबीज या रोगावरील लसीला काय म्हणतात?
Ans- ARV
81) बालकांना जन्मापासून किती महिन्यांच्या आत बी सी जी ची लस दिली जाते?
Ans- 1 महिन्याच्या आत
82) कुटुंब नियोजनाचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम असे कोणत्या साली करण्यात आले?
Ans- 1978
83) पित्ताची निर्मिती कोणत्या इंद्रियात होते?
Ans- स्वादुपिंड
84) पुरुषांची लिंग गुणसूत्रे कोणती?
Ans- XY
85) त्वचेमार्फत कोणत्या जीवनसत्वाची निर्मिती होते?
Ans- ड
86) दंतक्षयाच्या प्रतिबंधासाठी कोणत्या पेस्टचा वापर करतात?
Ans- फ्लोराईडयुक्त
87) मनुष्याचा सामान्य रक्तदाब किती असतो?
Ans- 120/80 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी
88) सामान्य मनुष्यामध्ये एक मिनिटात नाडीचे किती ठोके पडतात?
Ans- 72
89) ज्या आजाराचा प्रसार एक व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीस होत नाही अशा आजारास कोणते आजार म्हणतात?
Ans- असांसर्गिक
90) डेंग्यू आजारामध्ये रक्तातील कोणत्या पेशी कमी होण्याची शक्यता असते?
Ans- प्लेटलेट्स
91) क्षयरोग या आजाराच्या उपचारासाठी कोणते औषध वापरतात?
Ans- रिकाम्पीसीन
92) आदिवासी भागामध्ये किती लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते?
Ans- 20000
93) क्षयरोग या आजाराच्या जंतूचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
Ans- रॉबर्ट कॉक
94) कोणत्या वयोगटातील व्यक्तीला कोणत्याही कारणांमुळे अचानक लुळेपणा आला तर त्याला संशयित पोलिओ रुग्ण समजण्यात येते?
Ans- 0 ते 15 वर्षे
95) एचआयव्हीचा प्रसार कोणत्या माध्यमातून होतो?
Ans- दूषित रक्त व सुया
96) गर्भवती महिलेला गरोदरपणात धनुर्वाताचे किती डोस द्यावे?
Ans- 2
97) आयोडीन च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
Ans- गलगंड
98) जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
Ans- 24 मार्च
99) टॉयफाईड या आजारात मानवी शरीराचा कोणता अवयव प्रभावित होतो?
Ans- आतड्यातील पेयर्स प्याचेस
100) पेनिसिलिन या प्रतिजैविकांचा शोध कोणी लावला?
Ans- अलेक्झांडर फ्लेमिंग
उर्वरित प्रश्नांसाठी Part 2 पहा..

2 comments:

  1. Sir arogya sevak exam practice question kasa pahata yetil

    ReplyDelete