Mpsc Guru

Focus on commitment, not motivation.

Saturday, December 28, 2019

राज्यसेवा पूर्व परीक्षा- 200 पदांसाठी जाहिरात प्रसिध्द | State Services Preliminary Examination 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र सरकारच्या गट अ आणि ब संवर्गातील विविध पदांसाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. त्यासाठी 5 एप्रिल 2020 रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे.
 State Services Preliminary Examination 2020

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 

 • एकूण जागा 200
1) सहाय्यक राज्यकर आयुक्त- 10 जागा
2) उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी -7 जागा
3) सहाय्यक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी- 1 जागा
4) उद्योग उपसंचालक- 1 जागा
5) सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता - 2 जागा
6) उपशिक्षणाधिकारी - 25 जागा
7) कक्ष अधिकारी - 25 जागा
8) सहायक गट विकास अधिकारी - 12 जागा
9) सहायक निबंधक सहकारी संस्था - 19 जागा
10) उपअधीक्षक भूमी अभिलेख - 6 जागा
11) उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क - 3 जागा
12) सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क -1 जागा
13) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी - 4 जागा
14) सहायक प्रकल्प अधिकारी/संशोधन अधिकारी - 11 जागा
15) नायब तहसीलदार - 75 जागा.
 • शैक्षणिक पात्रता-  उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण किंवा शेवटच्या वर्षात शिकत असावा.
 • पूर्व परीक्षेची फी- 
खुल्या प्रवर्गासाठी - 524 रुपये
मागास प्रवर्गासाठी - 324 रुपये
 • अर्ज करण्याची तारीख- 
23 डिसेंबर 2019 ते 13 जानेवारी 2020 पर्यंत
अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थितपने वाचून नंतर अर्ज करा.
जाहिरात download करण्यासाठी - click here
अर्ज करण्यासाठी - click here

Friday, December 20, 2019

MPSC State Service (Rajyaseva) Exam Question Papers with answer keys.

MPSC State Service Exam 2019 Question Papers and Answer key Download

MPSC State Service (Rajyaseva) Exam Question Papers with answer keys.

 

1) MPSC State Service Pre Exam 2019 Question Papers and answer keys

Paper 1 -G.S.             Download

Answer key               Download 
Paper 2 -CSAT.          Download

 Answer . key             Download

2) MPSC State Service Main Exam 2019 Question Papers and answer keys

GS Paper 1 -               Download

 Answer . key             Download 

GS Paper 2 -               Download

 Answer . key             Download
GS Paper 3 -               Download

 Answer . key             Download  
  
GS Paper 4 -               Download

 Answer . key             Download

 Language 1 -             Download

Language 2 -              Download

 Answer . key             Download

Thursday, December 19, 2019

MPSC च्या तयारीला सुरुवात कशी कराल ? How to start preparing for mpsc

         मित्रांनो आज महाराष्ट्रात लाखो मुले स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी पुढे येत असून त्यातील बहुतेक विध्यार्थ्यांचा सुरुवातीला एक प्रश्न हमखास ऐकायला मिळतो की परीक्षेच्या तयारीची सुरुवात कशापासून करू? या प्रश्नाचं उत्तर आज आपण या लेखातून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे .आणि स्पर्धा परीक्षांच्या तुमच्या प्रयत्नांना लवकर कसे यश मिळेल यासाठी काही tips शेअर करणार आहे.
How to start preparing for mpsc

 MPSC च्या तयारीला सुरुवात

1) परीक्षेची निवड - 

सर्वप्रथम तुम्ही MPSC का करत आहात आणि तुम्हाला कोणती पोस्ट मिळवायची आहे हे ठरवा कारण Mpsc उपजिल्हाधिकारी पदापासून लिपिक पदापर्यंत विविध परीक्षा घेत असते. प्रत्येक परीक्षेला वेगळा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती असते एकदा तुम्ही एक टार्गेट ठरवले त्यासाठी एक ठराविक strategy ने वाटचाल करता येते. आणि गोंधळ कमी होतो बरेच मुले तलाठी पासून UPSC पर्यंत सर्व परीक्षा देतात. काही मुले 4 महिने राज्यसेवेचा अभ्यास 4 महिने psi/sti/aso आणि 4 महिने क्लास 3 चा अभ्यास करतात. अस नाही की इतर परीक्षा देऊ नये पण त्या देताना तुम्ही कोणत्यातरी एका परीक्षेला फोकस करूनच वेळेचं नियोजन केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरते.

2) अभ्यासक्रम- 

सर्वप्रथम तुम्हाला ज्या परीक्षेची तयारी करायची आहे तिचा अभ्यासक्रम download करा आणि त्याची हार्ड कॉपी करून ठेवा.
3) मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका- 
तुम्ही तयारी करण्यासाठी निवडलेल्या परीक्षेची तयारी करण्यासाठी सुरुवातीला त्या परीक्षेच्या मागील 3- 4 वर्षाच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका एक- दोनदा वाचून काढा व प्रश्नांचं स्वरूप समजून घ्या. त्यामुळे तुम्हाला परिक्षेसंबंधित बेसिक बाबी लक्षात येतील आणि तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे हे लक्षात येईल.
4) योग्य अभ्यास साहित्य निवड - 
आज बाजारात Mpsc च्या प्रत्येक विषयावर अनेक पुस्तके उपलब्ध आहे पण पुस्तके निवडताने योग्य आणि दर्जेदार असेच पुस्तके विकत घ्या यासाठी mpsc करत असलेल्या अनुभवी विद्यार्थ्यांचा सल्ला घ्या किंवा येथे आम्ही mpsc साठी उत्कृष्ट पुस्तकांची यादी दिली आहे ती सुद्धा बघुन घ्या.

5) अभ्यास- 

सुरुवातीला सर्व पुस्तके 1-2 वेळा शांतपणे समजून घेऊन  वाचून काढा. महत्त्वाचे आणि कठीण मुद्दे रेखांकित करून ठेवा. वेळेनुसार अभ्यासाचे टाइम -टेबल बनवा आणि त्याचे पालन करा.

6) नोट्स - 

संपूर्ण अभ्यासक्रमाला 2-3  revision झाल्यानंतर नोट्स काढण्याची सुरुवात करा . नोट्समध्ये महत्वाचा मजकूर कमीत कमी शब्दात मांडलेला असावा. नोट्सला आणि पुस्तकांना वेळोवेळी revision देत राहा.

7) test series - 

एकदा संपुर्ण अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने अभ्यासल्यानंतर test सिरीज घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करा. सोडविल्यानंतर गुणांचा विचार करू नका फक्त आपले काय चुकते त्याचे analysis करा आणि त्या मुद्यांवर जास्त फोकस करा.

8) मानसिक आणि शारीरिक तयारी- 

अभ्यास करताना विचार सकारात्मक ठेवा. सकाळी थोडाफार व्यायाम केल्याने खूप फायदा होतो तसेच पुरेसा आराम आणि झोप घ्या. 
          वरील सर्व टिप्सचा विचार करून अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्हाला वरील लेख कसा वाटला आणि तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा  धन्यवाद...

Tuesday, December 17, 2019

महत्वाच्या घटनादुरुस्त्या | MPSC Polity Notes

            भारतीय राज्यघटनेत आतापर्यंत(2019) 104 वेळा बदल करण्यात आला असून त्यातील परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या घटनादुरुस्त्या आपण या लेखात पाहणार आहोत. MPSC च्या राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेत यावर नेहमीच प्रश्न विचारले जातात.
MPSC Polity Notes

 महत्वाच्या घटनादुरुस्त्या  MPSC Polity Notes-

 • 7 वी घटनादुरुस्ती 1956- 
राज्यांची पुनर्रचना 14 राज्ये आणि 6 संघराज्य यादी समाविष्ट केली.
दोन किंवा अधिक राज्यांसाठी एक उच्च न्यायालय स्थापण्याची तरतूद केली.
 • 24 वी घटनादुरुस्ती 1971 -
मूलभूत अधिकारासह घटनेच्या कोणत्याही भागात संसद बदल करू शकते.
घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देने राष्ट्रपतींना बंधनकारक करण्यात आले.
 • 26 वी घटनादुरुस्ती 1971- 
संस्थानिकांचे तनखे बंद करण्यात आले.
 • 42 वी घटनादुरुस्ती 1976-
या दुरुस्तीला mini Constitution असेही म्हटले जाते.
घटनेच्या सरनाम्या मध्ये समाजवादी , धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या तीन शब्दांचा समावेश केला.
घटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश केला ( स्वर्णसिंग समिति)
मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक केला.
लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ 6 वर्षे करण्यात आला.
न्यायालयाचे पुनर्विलोकन आणि प्राधिलेख अधिकार कमी करण्यात आले
लोकसभेत आणि विधानसभेत गणपूर्तीची अट रद्द करण्यात आली
 • 43 वी घटनादुरुस्ती 1977- 
उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायिक पुनर्विलोकन आणि प्राधिलेख अधिकार पूर्ववत करण्यात आले.
 • 44 वी घटनादुरुस्ती 1978-
या दुरुस्तीने 42 व्या घटनादुरुस्तीने केलेल्या अनेक तरतुदी रद्द करण्यात आल्या.
लोकसभेचा आणि विधानसभेचा कार्यकाळ पुन्हा 5 वर्ष करण्यात आला. तसेच गणपूर्तीची अट पुन्हा करण्यात आली.
राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाचा सल्ला एकदा पुनर्विचार करण्यासाठी पाठविण्याचा अधिकार देण्यात आला.
न्यायालयाचे पुनर्विलोकन आणि प्राधिलेख अधिकार पुनर्स्थापित करण्यात आले .
संपत्तीचा मूलभूत हक्क रद्द करून त्याला कायदेशीर अधिकारात रूपांतरित करण्यात आले
राष्ट्रपतींना आणीबाणी जाहीर करण्यासाठी मंत्रिमंडळाची शिफारस आवश्यक करण्यात आली.
राष्ट्रीयआणीबाणीमध्ये अंतर्गत अशांतता याऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द टाकण्यात आला.
 • 52 वी घटनादुरुस्ती 1985-
घटनेत 10 वे परिशिष्ट पक्षांतर बंदी कायदा
 • 61 वी घटनादुरुस्ती 1989- 
निवडणुकीत मतदानासाठी वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले.
 • 69 वी घटनादुरुस्ती 1991-
दिल्लीस विशेष दर्जा देऊन नाव दिल्लीचे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असे करण्यात आले.
दिल्लीसाठी विधानसभा व मंत्रिमंडळाची तरतूद केली.
 • 73 वी घटनादुरुस्ती 1993-
पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा व संरक्षण देण्यात आले.
 • 74 वी घटनादुरुस्ती 1993-
नागरी स्थानिक संस्थांना घटनात्मक दर्जा व संरक्षण दिले.
 • 86 वी घटनादुरुस्ती 2002-
कलम 21 अ नुसार प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क बनविण्यात आला.
कलम 45 मध्ये बदल 
कलम 51 अ नवीन कर्तव्य समाविष्ट केले.
 • 88 वी घटनादुरुस्ती 2003-
सेवा कर लागू करण्यात आला.
 • 91 वी घटनादुरुस्ती 2003- 
मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या एकूण सदस्यसंख्येच्या 15 टक्के पेक्षा जास्त असणार नाही अशी तरतूद करण्यात आली.
 • 92 वी घटनादुरुस्ती 2003 -
घटनेच्या 8 व्या परिशिष्टात बोडो, डोग्री, मैथिली आणि संथाली या भाषांचा समावेश केला. (22 भाषा)
 • 97 वी घटनादुरुस्ती 2012-
सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण दिले.
 • 99 वी घटनादुरुस्ती 2015- 
न्यायिक नियुक्ती आयोग स्थापन केला( न्यायालयाने दुरुस्ती घटनाबाह्य ठरवली )
 • 100 वी घटनादुरुस्ती 2015- 
बांगलादेश सोबत जमीन हस्तांतरण करण्यात आले.
 • 101वी घटनादुरुस्ती 2017-  
GST ही नवीन करप्रणाली लागू करण्यात आली.
 • 102 वी घटनादुरुस्ती 2018-
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगास घटनात्मक दर्जा देण्यात आला.
 • 103 वी घटनादुरुस्ती 2019-
आर्थिक मागास प्रवर्गासाठी 10 टक्के आरक्षण देण्यात आले.Thursday, December 12, 2019

भारतीय रिझर्व्ह बँक -Mpsc Economy Notes

RBI ची स्थापना- 

भारतीय रिझर्व्ह बँक -Mpsc Economy Notes

 • १९२६ साली यंग हिल्टन यांच्या अध्यक्षतेखालील स्थापन करण्यात आलेल्या दि रॉयल कमिशन ऑन इंडीयन करन्सी एंड फायनान्स या आयोगाने भारतात मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस केली.
 •  RBI ACT 1934 नुसार १ एप्रिल १९३५ रोजी RBI स्थापन होऊन तिचे कार्य सुरु झाले.
 • सुरुवातीला RBI चे मुख्य कार्यालय कोलकाता येथे सुरु झाले नंतर १९३७ मध्ये ते मुंबईला हलविण्यात आले.
 • RBI सुरुवातीला भारतासह १९४२ पर्यंत ब्रम्हदेशाचे चलन नियंत्रित करत होती. तसेच १९४७ ला पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून ३० जून १९४८ पर्यंत पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणूनही कार्य केले.
 • RBI ची स्थापना खाजगी क्षेत्रात करण्यात आली होती तेव्हा चे भाग भांडवल ५ कोटी रूपये होते. तसेच प्रत्येक भागाची किमत १०० रुपये होती.
 • RBI कायदा १९४८ ( सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण कायदा ) नुसार १ जानेवारी १९४९ रोजी RBI चे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

RBI चे व्यवस्थापन-

 •  RBI चे मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे असून दिल्ली , कोलकाता, चेन्नई, आणि मुंबई येथे ४ स्थानिक मंडळे आहे.
 • RBI ची १९ विभागीय कार्यालये आहेत.
 • RBI चे व्यवस्थापन मध्यवर्ती संचालक मंडळाकडे असते या मंडळात २० सदस्य असतात त्यात एक गव्हर्नर आणि ४ उप गव्हर्नर असतात.
 • गव्हर्नर हा RBI चा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.
 • सर ओसबोर्न स्मिथ हे RBI चे पहिले गव्हर्नर होते तर श्री सी.डी. देशमुख(११ ऑगस्ट १९४३ ते ३० जून १९४९) हे पहिले भारतीय गव्हर्नर होय.
 • सी. डी. देशमुख यांच्याच काळात RBI चे राष्ट्रीयीकरणकरण्यात आले.
 • सर्वाधिक काळ RBI चे गव्हर्नर- बेनेगल रामाराव (१ जुलै १९४९ ते १४ जानेवारी १९५७) 
 • सध्या  शक्तीकांत दास हे सप्टेंबर २०१८ पासून RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्य करत आहेत. तसेच १) एस.एस.मुंद्रा २) एन.एस. विश्वनाथन ३) आर. गांधी हे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत. या सर्वांची नेमणूक केंद्र सरकार मार्फत ५ वर्षासाठी केली जाते. हे सर्व वयाच्या ६२ वर्षापर्यत कार्य करू शकतात.
 • RBI चे जमाखर्चाचे वर्ष- १ जुलै ते ३० जून.
   RBI एक रुपयाची नाणी व नोट वगळता सर्व चलन छापते व वितरण करते .


RBI चे कार्य -

 •  चलन निर्मिती आणि नियंत्रण 
 • बँकांची बँक म्हणून कार्य 
 • सरकारला मोफत बँक सेवा देते.
 • पतनियंत्रण करणे.
 • विनिमय दरात स्थैर्य राखणे.
 • परकीय चलन साठा सांभाळणे.
 • देशातील बँकांचे पर्यवेक्षण करणे त्याच्यावर नियंत्रण ठेवणे.
 • विविध क्षेत्राचा वित्तपुरवठ्याचे प्रवर्तन करणे.
 • पैशाच्या देवाणघेवाणीवर नियंत्रण ठेवणे.

RBI चे पतधोरण-

RBI द्वारे पतचलन निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी  अर्थव्यवस्थेतील पतव्यवहाराचे नियंत्रण केले जाते 

RBI ची पतनियंत्रनाची साधने-

➤ संख्यात्मक साधने
१) बँक दर - RBI व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर.
२) रोख निधीचे प्रमाण 
रोख राखीव प्रमाण (CRR) - प्रत्येक व्यापारी बँकेस आपल्या एकूण जमा झालेल्या ठेवींच्या प्रमाणात काही रक्कम RBI कडे ठेवावी लागते.
वैधानिक रोखता प्रमाण (SLR)- प्रत्येक व्यापारी बँकेला आपल्याकडे जमा झालेल्या एकूण ठेवी पैकी काही रक्कम आपल्याकडे रोख स्वरुपात किवा सोन्याच्या स्वरुपात ठेवावी लागते त्याचे प्रमाण.
३) रेपो व रिव्हर्स रेपो व्यवहार- बँकांच्या हातातील अल्पकालीन रोखता वाढवण्यासाठी किवा कमी करण्यासाठी हे व्यवहार केले जातात.
४) खुल्या बाजारारातील रोख्यांची खरेदी विक्री- RBI केंद्र सरकारच्या रोख्याची खरेदी तसेच विक्री करून बाजारातील पतपैशावर नियंत्रण ठेवते. 
पत नियंत्रणाची गुणात्मक /विभेदात्मक साधने-
१) तारण व कर्ज रक्कम यामधील गाळा ठरवणे.
२ )कर्जाचे रेशनिंग 
३) उपभोग्य कर्ज नियंत्रण.
४) नैतिक समजावणी.
५) बँकांना आदेश देणे.
६) बँकावर कारवाई करणे.

इतर महत्वाचे मुद्दे -

 • जगातील पहिली मध्यवर्ती बँक- रिक्स बँक ऑफ स्वीडन (१६५६)
 • भारतात चलन निर्मितीसाठी १९५७ पर्यंत प्रमाण निधी पद्धत वापरली जात होती या पद्धतीत चलनाच्या ४० टक्के भाग सोन्याच्या स्वरुपात ठेवला जात होता.
 • १९५७ पासून किमान निधी पद्धत अवलंबण्यात आली या पद्धतीनुसार आता भारतीय चलनाला आधार म्हणून २०० कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे यात ११५ कोटी रुपयांचे सोने तर ८५ कोटी रुपयांचे परकीय कर्जरोखे ठेवण्यात आले आहे.

 RBI ची महत्वाची प्रकाशने-

१) वार्षिक
- Annual Report
- Trend and progress of banking in india
2) सहामाही 
- financial stability report
- monetary policy report
3) त्रैमासिक
Quarterly Statistics on Deposits and Credit of Scheduled Commercial Banks
4) मासिक 
- RBI Bulletin
- Monetary and Credit Information Review
5) साप्ताहिक
-Weekly Statistical Supplement to the RBI Bulletin
सध्याचे RBI ने जाहीर केलेले विविध रेट-
बँक रेट                        5.40 %
रेपो रेट.                        5.15 %
रिव्हर्स रेपो रेट.              4.90 %
MSF रेट                      5.40 %
रोख निधीचे प्रमाण
रोख राखीव प्रमाण(CRR).           4.00 %
वैधानिक रोखता प्रमाण (SLR).   18.50 %
MPSC short notes by mpscguru.com

Tuesday, December 3, 2019

राज्य राखीव पोलीस दल (SRPF) मध्ये 1847 जागांसाठी भरती | SRPF Recruitment 2019

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात SRPF सशस्त्र पोलीस शिपाई आणि चालक या 1847 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
राज्य राखीव पोलीस दल (SRPF) मध्ये 1847 जागांसाठी भरती | SRPF Recruitment 2019

१)  पोलीस शिपाई चालक- एकूण जागा -१०१९ जागा 

 • शारीरिक पात्रता - 
१) उंची - १६५ सेंमी (महिला-  १५८ सेंमी )
२) छाती - न फुगवटा १७९ सेंमी कमीत कमी आणि फुगवून ५ सेंमी फरक.
 • शैक्षणिक पात्रता-  मान्यताप्राप्त बोर्डमधून १२ वी उत्तीर्ण. तसेच हलके वाहन चालविण्याचा वैध परवाना (LMV- TR लायसेन्स ) आवश्यक.
 • वयोमर्यादा
दिनांक ३१- १२ - २०१९ रोजी
खुला प्रवर्ग -                                     १९ वर्षे ते २८ वर्ष.
SC/ST/OBC/SEBC/NT -                १९ वर्ष ते ३३ वर्ष.
तसेच इतरांसाठी वेगळी सुट.
 • ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप-
 १०० प्रश्नांसाठी १०० गुण
वेळ- ९० मिनिट.
अंक गणित -                                               २० गुण 
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी-             २० गुण
बुद्धिमत्ता चाचणी-                                       २० गुण
मराठी व्याकरण -                                        २० गुण
मोटार वाहन नियम -                                   २० गुण 
अर्जाची फी-
खुला प्रवर्ग- ४५० रुपये
मागास प्रवर्ग- ३५०रुपये.

२) सशस्त्र पोलीस शिपाई- एकूण जागा - ८२८ जागा 

 • शारीरिक पात्रता-

उंची- १६८ सेंमी
छाती- न फुगवटा १७९ सेंमी कमीत कमी आणि फुगवून ५ सेंमी फरक.
 • वयोमर्यादा- 
खुला -                                        १८ ते २५ वर्ष 
SC/ST/OBC/SEBC/NT -         १८ ते ३० वर्ष
 • शैक्षणिक पात्रता - १२ वी उत्तीर्ण.
ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप- 
१०० गुणांसाठी १०० प्रश्न 
 • वेळ- ९० मिनिट.
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी-      25 गुण
अंक गणित-                                 25 गुण
बुद्धिमत्ता चाचणी-                        25 गुण
मराठी व्याकरण-                           25 गुण
 • परिक्षा फी- 

खुला -                            ४५० रुपये
मागास प्रवर्ग-                 ३५० रुपये.
 • निवड प्रक्रिया - लेखी परीक्षेतून जागांच्या १: १० पट उमेदवार शारीरिक चाचणीसाठी घेतले जातील आणि त्यामधून एकूण गुणांच्या आधारे नेमणूक.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक-
२२/१२/२०१९
 सरकारी नोकऱ्यांच्या जाहिरातीची वेळोवेळी माहिती मिळवण्यासाठी www.mpscguru.com या संकेतस्थळावर भेट देत राहा.


Thursday, November 28, 2019

भारताचा इतिहास- बंगालचे गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल | Mpsc History Notes

बंगालचे गव्हर्नर-

१) रोबर्ट क्लाईव्ह- १७५७ ते १७६० आणि १७६५ ते १७६७ 

 • A Heaven born General असा गौरव इंग्लंडच्या पंतप्रधान पीट यांनी लॉर्ड क्लाईव्ह चा केला.
 • हिंदुस्तानचा फ्रेडरिक दि ग्रेट म्हणूनही क्लाईव्ह ओळखला जातो.
 • बंगालमध्ये १७६५ पासून क्लाईव्हने दुहेरी राज्यपद्धती सुरु केली या पद्धतीत राज्यव्यवस्था नवाबाकडे तर लष्करी व्यवस्था इंग्रजांनी आपल्या हातात ठेवली.
 • क्लाईव्ह ने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

२) वल्सर्ट- १७६७ ते १७६९ 

 • या काळात पहिले इंग्रज -म्हैसूर युद्ध होऊन हैदरअलीचा विजय झाला.

३) कार्टियर - १७६९ ते १७७४ 

 • १७७० ला बंगालमध्ये दुष्काळ पडून १/३ लोकसंख्या मृत्युमुखी पडली.

४) वॉरेन हेस्टिंग - १७७२ ते १७७४ 

 • हेस्टिंग ने १७७२ मध्ये दुहेरी राज्यपध्दती बंद केली.
 • बंगालमधील शेतजमिनी ५ वर्षाच्या कराराने लिलाव पद्धतीने देण्यास सुरुवात केली.
 • महसूल व्यवस्थेतील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी बोर्ड ऑफ रेव्हेन्यू ची स्थापना केली.

बंगालचे गव्हर्नर जनरल - 

१) वॉरेन हेस्टिंग- १७७४ ते १७८५ 

 • १७७३ च्या नियामक कायद्याने हेस्टिंग बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला.
 • प्रत्येक जिल्ह्यात हेस्टिंगने कलेक्टर चे पद निर्माण केले.
 • हेस्टिंग च्याच काळात चार्ल्स विल्किन्स ने भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले.
 • विल्यम जोन्स याने १७८४ साली कलकत्ता येथे रॉयल एशियाटिक सोसायटी ची स्थापना केली.
 • १७७५ ते १७८२ या काळात पहिले मराठा-इंग्रज युद्ध झाले ते १७८२ ला साल्बाईच्या तहाने संपुष्टात आले.
 • हेस्टिंगवर नंदकुमार फाशी प्रकरण,राजा चेतासिह प्रकरण,रोहील्यांशी युद्ध, अयोध्येच्या बेगमांवर अन्याय हि प्रकरने पैसे मिळविण्यासाठी केल्याचा आरोप झाला.
 • इग्लंडच्या संसदेत हेस्टिंग वर महाभियोग लावण्यात आला. असा महाभियोगास लावण्यात आलेला एकमेव गव्हर्नर होय.
 • हेस्टिंग च्या काळात १७८० ते १७८४ मध्ये दुसरे इंगज - म्हैसूर युद्ध झाले यात हैदरअली चा मृत्यू झाला.

२) सर जॉन मकफर्सन- १७८५ ते १७८६ 

 • दिल्लीचा बादशहा शाहआलम याचे बंद केलेले २६ लाख रुपयाचे पेन्शन पुन्हा सुरु करण्याची महादजी शिंदे यांची मागणी फेटाळून लावली.

३) लॉर्ड कार्नवॉलीस- १७६८ ते १७९३

 • अमेरिकन स्वातंत्र युद्धात भाग 
 • याच्या १७९० ते १७९२ या काळात तिसरे इंग्रज- म्हैसूर युद्ध टिपूने अर्धे राज्य गमावले.
 • बंगाल व बिहार प्रांतात २२ मार्च १७९३ पासून कायमधारा पद्धती सुरु केली.
 • कायमधारा पद्धतीत जमिन्दाराला शेतसारा १०/११ भाग सरकारला आणि १/११ भाग स्वतःसाठी ठेवायचा नियम होता. शेतकऱ्याकडून किती खंड घ्यावा याला काही मर्यादा नव्हती.
 •  कार्नवॉलीसने कोर्टात दावा दाखल करण्यासाठी कोर्ट फी सुरु केली.

४) सर जॉन शोअर - १७९३ ते १७९८ 

 • कायमधारा पद्धतीची मूळ संकल्पना आणि नियोजन शोअर चे होते.

५) लॉर्ड रिचर्ड वेलस्ली- १७९८ ते १८०५ 

 • तैनाती फौज ठेवण्यास सुरुवात.
 1.  निजामाने -१७९८ 
 2. म्हैसूर च्या राजाने १७९९ 
 3. औंध नवाबाने १८०१
 4. दुसरा बाजीराव पेशवा १८०२ मध्ये तैनाती फौज स्वीकारली.
 • १७९९ ला चौथ्या इंगज - म्हैसूरयुद्धात टिपू सुलतानचा श्रीरंगपट्टनम येथे मृत्यू.
 • ब्रिटीशांचा भारतात सर्वात जास्त विस्तार वेलस्लीच्या काळात झाला.
 • १८०० मध्ये अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना.

६) लॉर्ड कार्नवॉलीस- १८०५ 

 • दुसऱ्यांदा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला.
 • भारतात गाझीपूर ला मृत्यू.

७) सर जॉर्ज बार्लो - १८०५ ते १८०७ 

८) लॉर्ड अर्लऑफ  मिंटो 1- १८०७ ते १८१३

९)  लॉर्ड मार्क्विस ऑफ हेस्टिंग - १८१३ ते १८२३ 

 • १७१७ ते १७१८ मध्ये शेवटचे इंग्रज - मराठा युद्ध होऊन १८१८ मध्ये पेशवाई समाप्त झाली.
 •  हेस्टिंग ने  १८१७ ते १८१८ या काळात पेंढाऱ्याचा बंदोबस्त केला.
 • १८१४ ते १८१६ मध्ये पहिले इंग्रज-नेपाळ युद्ध आणि सांगोलीचा तह.
 • होल्ट म्याकेन्जी आणि मार्टीन बर्ड यांनी उत्तर भारतात आग्रा , पंजाब या भागात महालवारी पद्धत विकसित केली.
 • कर्नल रिड यांनी मद्रास प्रांतात रयतवारी पद्धत सुरु केली.
 • तर सर एलफिस्टन यांनी मुंबई प्रांतात सर्वे शेतसारा पद्धत सुरु केली.
 • कुळांना संरक्षण देण्यासाठी हेस्टिंगने १८२२ साली बंगाल कुळकायदा केला.

 १०) सर जॉन ऐडम्स-१८२३

११) लॉर्ड एमहर्स्ट - १८२३ ते १८२८ 

 • पहिले इंग्रज - ब्रम्ही युद्ध १८२४ ते १८२६

१२) विलियम बटरवर्थ बेले- १८२८

१३) लार्ड विलियम बेन्टिक- १८२८ ते १८३३.

 • इंग्लंडचे पंतप्रधानांचा मुलगा असणारा गव्हर्नर झालेला एकमात्र.
 • बेन्टिकने गुन्हेगारांना फटके मारण्याची शिक्षा बंद केली.
 • १८३१ च्या कायद्याने भारतीयांना न्याय खात्यात प्रवेश दिला आणि न्यायालात फारसी एवजी देशी भाषेचा वापर सुरु केला.
 • ४ डिसेंबर १८२९ ला सती प्रथा बंद करण्याचा कायदा केला.

 १८३३ च्या कायद्यानुसार बंगालचे गव्हर्नर भारताचे गव्हर्नर जनरल झाले त्यांची माहिती पुढील भागात पहा...@mpsc short notes by mpsc guru